Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मनस्वी सामाजिक कार्यकर्ते दिवंगत हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त बीड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदलेले सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख बीडमध्ये येणारसा. ‘युवा लोकमित्र’च्या वर्धापन दिन पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष उपस्थिती
बीडकरांना वेठीस धरणारा मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव, बीड जिल्हा बचावराष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट कामांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने-डॉ.गणेश ढवळे
धुनकवाड-2 ची सुपुत्री अंजली विश्वनाथ भोसले हिचे घवघवीत यश



मनस्वी सामाजिक कार्यकर्ते दिवंगत हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त बीड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन येत्या शुक्रवार, दि. 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता, बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात करण्यात आले आहे. हा उपक्रम डॉ. संजय तांदळे (मातृभूमी प्रतिष्ठान), प्रवीण पालीमकर (शेतकरी राजा सामाजिक समिती) आणि एस. एम. युसूफ (मुक्त पत्रकार) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सतीश साळुंखे आणि प्रा. डॉ. सविता शेटे उपस्थित राहणार आहेत. हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार, आप्तेष्ट आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

COMMENTS