Homeताज्या बातम्या

प्रेमसंबंधाला विरोध करत आईने ओढणीने आवळला १९ वर्षीय मुलीचा गळा; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

उल्हासनगर: शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून आईनेच आप

पुनर्वसित गावांसाठी ८५ कोटींची विकासखैरात; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, ठेकेदारांना लाभाचा आरोप
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर अधिवेशनात लक्षवेधी मांडावी; खासदार-आमदारांना डॉ. हंसराज वैद्य यांचे आवाहन
देवळाली प्रवरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय तरुण ठार
kolhapur crime three members of the same family of Shahuwadi taluka died in  a terrible accident near Karad satara | Accident : कराडजवळ भीषण अपघातात  शाहूवाडी तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा ...

उल्हासनगर: शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून आईनेच आपल्या १९ वर्षीय मुलीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक एकच्या पोलिसांनी आरोपी आईला तातडीने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर -१ परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकर नगर येथे राहणारी अमृता गरड हिचे घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला तिची आई आशा गरड यांचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून काल रात्री आई आणि मुलीमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी घरात अमृताचे वडील आणि दोन भाऊ झोपलेले होते.

वाद विकोपाला गेल्यानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असताना, रागाच्या भरात आई आशा गरड हिने ओढणीच्या साहाय्याने मुलीचा गळा आवळून हत्या केली. या घटनेत अमृताचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक १ गाठून पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपी आई आशा गरड हिला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक १ चे अधिकारी या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

COMMENTS