देशभरात पार पडलेल्यानीट यूजी 2026परीक्षेनंतर पेपर लीक झाल्याच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीव

देशभरात पार पडलेल्यानीट यूजी 2026परीक्षेनंतर पेपर लीक झाल्याच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा एन.एस.यु.आय. (विद्यार्थी काँग्रेस) यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, भूम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, लाखो विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम घेऊन नीट परीक्षेची तयारी करतात. पालकही मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. मात्र पेपर लीकसारख्या घटनांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. यावेळी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) रद्द करण्यात यावी, पेपर लीक प्रकरणातील दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी धाराशिव एन.एस.यु.आय.चे जिल्हाध्यक्ष अॅड. मुशरफ सय्यद, अॅड. सोहेल शेख, अनिकेत गायकवाड, फय्याज पठाण यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS