Homeताज्या बातम्या

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल; ८३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण, ६२४ विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी

संगमनेर: राज्यामध्ये उच्च व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये अग्रमानांकित असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील पॉलिटेक्निकच्या विद्या

’आनंदाचे डोही, आनंद तरंग’ : स्वरांतून अवतरला विठ्ठलभक्तीचा उत्सव; नांदेडात भक्तिसंगीत सोहळा उत्साहात
कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या पदभरतीला सुरुवात; नगराध्यक्षा, उपाध्यक्षा व नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश
भेसळखोरांवर एफडीएचा दणका! २ महिन्यांत नांदेडच्या दूध संकलनात २२ हजार लिटरची घट
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम; ८३  विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण – Om Sai News

संगमनेर: राज्यामध्ये उच्च व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये अग्रमानांकित असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६ च्या अंतिम परीक्षेत सर्व शाखांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. यंदा तब्बल ८३ विद्यार्थ्यांनी विविध विषयांत शंभर पैकी १०० गुण मिळवून संस्थेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी दिली.

एमएसबीटीई परीक्षा २०२६ मध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधील विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले. उत्कृष्ट गुणवत्ता आणि निकालासोबतच, अमृतवाहिनी संस्थेचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर सामंजस्य करार झाले आहेत. यामुळे नामांकित कंपन्या थेट महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्यू घेतात. या पार्श्वभूमीवर, यावर्षी ६२४ विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजवर थेट नोकरीची संधी मिळाली आहे. सातत्याने होत असलेल्या या प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना उत्तम करिअर घडवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

या उत्कृष्ट निकाला बद्दल व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमिक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव आणि प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

COMMENTS