Homeताज्या बातम्या

कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या पदभरतीला सुरुवात; नगराध्यक्षा, उपाध्यक्षा व नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

कुंडलवाडी : कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली ग्रामीण रुग्णालयाची मागणी अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आह

किनवटजवळ चिखली शिवारात वीज कोसळून १५ वर्षीय बालकाचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
हार-तुरे नव्हे, समाजसेवेतूनच पंकजाताईंना शुभेच्छा; जव्हारवाडीत विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप
श्री बंकटस्वामी महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

कुंडलवाडी : कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली ग्रामीण रुग्णालयाची मागणी अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या पदभरतीला सुरुवात झाली असून, रुग्णालयात पहिल्या डॉक्टर म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कदम (एमबीबीएस, एमडी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कुंडलवाडी शहरात ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून राज्य शासनाकडे करण्यात येत होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाला शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले. मात्र, इमारत तयार होऊनही उद्घाटन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या नियुक्त्या रखडल्याने रुग्णालय सुरू होण्यास विलंब होत होता. यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधींनी आमदार, खासदार, पालकमंत्री, आरोग्य विभाग तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करून रुग्णालयाचे उद्घाटन आणि डॉक्टरांसह आवश्यक पदांची भरती करण्याची मागणी केली होती. मात्र, विविध कारणांमुळे ही प्रक्रिया प्रलंबित राहिली होती.

दरम्यान, कुंडलवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांनी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न गांभीर्याने घेतला. त्यांनी आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांची भेट घेऊन ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक पदभरती करण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार, नगराध्यक्ष प्रतिनिधी गजानन कोटलावार तसेच नगरसेविका प्रतिनिधी संजय पाटील खुळगे उपस्थित होते.

नगराध्यक्षा यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालयात पहिल्या डॉक्टर म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कदम (एमबीबीएस, एमडी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या इतर पदांचीही लवकरच नियुक्ती करण्यात येणार असून, ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची ग्वाही आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांना दिली.

ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर कुंडलवाडी शहरासह परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून, उपचारासाठी इतर शहरांमध्ये जाण्याची नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नासाठी नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार, उपनगराध्यक्षा नेहा रयाकावार तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत होत असून, त्यांच्या प्रयत्नांबद्दल नागरिकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

COMMENTS