Homeताज्या बातम्या

भेसळखोरांवर एफडीएचा दणका! २ महिन्यांत नांदेडच्या दूध संकलनात २२ हजार लिटरची घट

नांदेड: जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या कठोर मोहिमेचा थेट परिणाम दूध संकलनावर दिसून येत आहे. गेल्या द

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्नपूर्ती करा; पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे शेवगावमधील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
कायदे पुरेसे नाहीत, अंमलबजावणीही तितकीच प्रभावी हवी!
अर्धापूर येथे अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

नांदेड: जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या कठोर मोहिमेचा थेट परिणाम दूध संकलनावर दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील दैनंदिन दूध संकलनात सुमारे २२ हजार लिटरची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटीमागे नैसर्गिक कारणे असली, तरी भेसळयुक्त दूध तयार करणार्‍या आणि पावडरपासून कृत्रिम दूध बनविणार्‍या रॅकेटवर झालेल्या कारवाईमुळेच ही मोठी घट झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून एफडीएने जिल्ह्यातील विविध दूध संकलन केंद्रे, डेअर्‍या आणि संशयित ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकत भेसळयुक्त दूध आणि त्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे बनावट दूध तयार करणार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आपले अवैध व्यवहार बंद केल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पूर्वी संकलित होणार्‍या दुधाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.

विशेष म्हणजे, या कारवाईने ग्राहकांच्या मनातही एक गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. आतापर्यंत आपल्या घरात आणि मुलांच्या पोटात जाणारे दूध खरोखरच शुद्ध होते का, असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करीत आहेत. अधिक नफा कमावण्यासाठी काही भेसळखोर दुधात डिटर्जंट, युरिया, स्टार्च आणि सिंथेटिक रसायने मिसळतात. अशा दुधाच्या सेवनाने पचनसंस्थेचे विकार, यकृत व मूत्रपिंडाचे आजार, तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अधिकृत विक्रेत्याकडूनच दूध घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात आहे.

दरम्यान, एफडीएची ही मोहीम आगामी काळातही अधिक तीव्र करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. नियमित नमुना तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात शुद्ध दूध पुरवठ्याची व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS