Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी शहरात पाळला कडकडीत बंद

छत्रपती शिवरायांविषयी अवमानकारक पोस्ट केल्यामुळे तणाव

पाथर्डी/प्रतिनिधी ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शेवगाव येथील समाजकंटकांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर बदनामीक

खोदकामात सापडला 1098 कॅरेट मोठा हिरा LokNews24
कापड बाजारात हातगाड्यांच्या अतिक्रमणावरून वाद व तणाव
दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर

पाथर्डी/प्रतिनिधी ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शेवगाव येथील समाजकंटकांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ समस्त हिंदू समाज आणि शिवप्रेमींच्या वतीने पाथर्डी शहर बंद ठेवत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ढाकणे, अंकुश चितळे, सोमनाथ बोरुडे, विष्णूपंत पवार, सागर गायकवाड, विक्रम ससाने, अंबादास आरोळे, दादासाहेब डांगे, देवा पवार, दत्ता पाठक, सचिन नागपुरे तसेच शहरातील शिवप्रेमी उपस्थित होते.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत कोरडगाव चौक,नवीपेठ,येथून फेरी काढत  शिवप्रेमींच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले.त्यानंतर शहरातील वसंतराव नाईक चौकात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विविध पक्षातील शिवप्रेमींनी बोलताना म्हटले की,शेवगाव येथील समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकुर टाकून शिवप्रेमीच्या भावना दुखवण्याचे काम केले आहे.पोलिस प्रशासनाने तात्काळ या घटनेतील संबंधिताना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कठोरातील कठोर शासन करावे म्हणजे भविष्यात महापुरुषांबद्दल कोणी समाजामाध्यमातून वाईट गोष्टी पसरवणार्‍यांचे धाडस करणार नाही.तसेच समाजातील तेढ आणि सामाजिक सलोखा टिकून राहील. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांनी तुमच्या भावना वरिष्ठापर्यत पोहचण्यात येतील असे आश्‍वासन दिले. यावेळी पाथर्डी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या बंदमध्ये सहभागी न झाल्याने तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी पदाचा राजीनामा देत असल्याबाबत निषेध सभेत जाहीर केले.

COMMENTS