Homeताज्या बातम्याबीड

आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्केयशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान

शहरातील आदित्य नर्सिंग महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (चणकड), नाशिकच्या परीक्

संजीवनी पॉलिटेक्निक ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेत प्रथम 
कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचा दहावीचा निकाल 80.83 टक्के
काळेगाव हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के7 विद्यार्थिनींची 90 टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई



शहरातील आदित्य नर्सिंग महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (चणकड), नाशिकच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा सातव्या सत्राचा निकाल तब्बल 100 टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीत यश मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले. विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात आदित्य नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सर्वच सत्रांत आपला दबदबा निर्माण केला आहे. सातव्या सत्रात  प्रदिप गोकुळ भांगे याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय  रचना दिपक अवसरमोल, तृतीय  सुरज शाहु घुले. 6 व्या सत्रामध्ये प्रथम क्रमांक साक्षी माने, द्वितीय  प्रथमेश निकाळजे, तृतीय आंचल थाटे इतर विद्यार्थ्यांनीही उच्चांकी गुण मिळवत यश प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थिनी रचना अवसरमोल हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले. नर्सिंग हे केवळ शिक्षण नसून सेवा आणि समर्पणाची भावना आहे, हे आम्हाला येथे शिकायला मिळाले.
कठोर परिश्रमाचे फळ
महाविद्यालयाचा सातव्या सेमिस्टरचा निकाल 100 टक्के लागणे ही अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांनी शिस्त आणि समर्पणाच्या जोरावर हे यश मिळवले. भविष्यात हे विद्यार्थी उत्कृष्ट परिचारिका बनून समाजसेवा करतील, असा विश्वास वाटतो.
-डॉ. आदिती सारडा (संचालिका, आदित्य शिक्षण संस्था, बीड

COMMENTS