Homeताज्या बातम्या

सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत अनन्याचे यश

श्रीरामपूर : रयत माऊलीच्या संस्कारांनी सुसंस्कृत झालेल्या खंडाळा येथील 'न्यू इंग्लिश स्कूल'च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. राज्

आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्केयशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान
सांगवी सूर्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्राध्यापकांनी संशोधनाकडे गांभीर्याने पाहणे ही काळाची गरज-प्रा.डॉ.महेंद्र शिरसाटतुलसी शैक्षणिक समूहात सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न


श्रीरामपूर : रयत माऊलीच्या संस्कारांनी सुसंस्कृत झालेल्या खंडाळा येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. राज्यस्तरीय सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक परीक्षेत विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी अनन्या गणेश ढोकचौळे हिने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या यशाची पताका अधिक उंच केली.
अनन्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगलदास बत्तीसे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या गतिमान व प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली विद्यालयात सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. हे यश म्हणजे विद्यार्थ्यांची कठोर मेहनत आणि विद्यालयातील गुरुजनांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे सुवर्णफळ आहे.”
या यशामागे सरोज अहिरे, दत्तात्रय शिरसाठ, भाऊसाहेब लोंढे, सुनिल पवार, रामभाऊ जाधव, मुकेश देशमुख, रुपाली पवार, उषा रेपाळे, संगिता बर्डे, राहुल छल्लारे, कविता कोबरने, अशोक तिटकारे आणि शायदा बागवान या मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले.
या यशाबद्दल संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीना जगधने, भागवत ढोकचौळे, आबासाहेब ढोकचौळे, विजय चव्हाण आणि विद्यालयाच्या विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अनन्याचे व तिच्या पालकांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS