Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय मोर्चेबांधणी

राज्यात सध्या तरी निवडणुकांना अवकाश आहे. मात्र अवघ्या काही महिन्यांवर राज्यातील मोठ्या निवडणुका येवून ठेपल्या असेच वातावरण महाराष्ट्रात बघायला मि

आरटीईच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
जनतेच्या प्रश्‍नांचे काय ?
ऐतिहासिक करार

राज्यात सध्या तरी निवडणुकांना अवकाश आहे. मात्र अवघ्या काही महिन्यांवर राज्यातील मोठ्या निवडणुका येवून ठेपल्या असेच वातावरण महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि लोकसभेच्या एप्रिल 2024 मध्ये तर विधानसभा ऑक्टोबर 2024 मध्ये होण्याची शक्यता असतांना, राज्यात ऐन मे महिन्यातच निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी जोरदार बैठकांचे सत्र चालविले आहे. शिवाय केंद्रीय गृहमंत्री दोनवेळेस महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येवून गेल्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा देखील मुंबई दौर्‍यावर आहेत. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. केवळ भाजपचे दौरे, रणनीती बाबत बैठकांचा जोर वाढला असे नाही, तर राष्ट्रवादी काँगे्रसने देखील बैठकांचा जोर वाढवला आहे. सिल्वर ओकवर पुढील निवडणुकांची रणनीती ठरतांना दिसून येत आहे. शरद पवारांनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे की, कर्नाटकातील ट्रेंड महाराष्ट्रात देखील कायम आहे. त्यामुळे राज्यात भाजपविरोधात वातावरण असून, त्याचा फायदा घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी तयार राहावे. तसेच महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी एकत्र लढण्यावर प्राधान्य द्यावे, असे देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने देखील आपल्या जिल्हाप्रमुख पदाच्या नेत्याची बैठक घेत पुढील रणनीती आखली आहे. ठाकरे गट निवडणुकीच्या बाबतीत मोठी आघाडी घेतांना दिसून येत आहे. लोकसभेसाठी उमेदवारांची निवड, त्यासाठी पुढील रणनीती या सर्व बाबींवर ठाकरे गटात मोठा खल सुरू असून, त्याचा फायदा म्हणजे पक्षाला निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

कोणता उमेदवार कुठे उभा करायचा, याची चाचपणी आतापासून सुरू असल्यामुळे आपल्या नेत्यांना बळ देण्याचे काम ठाकरे गटाकडून सुरू आहे. असे असतांना काँगे्रस मात्र या प्रक्रियेत अद्याप कुठेच दिसत नाही. काँगे्रसने कर्नाटक काबीज केले असल्यामुळे काँगे्रसचा आत्मविश्‍वास प्रचंड प्रमाणात दुणावला असून, काँगे्रस स्वबळाची भाषा करतांना दिसून येत आहे. असे जर झाल्यास महाविकास आघाडीची व्रजमूठ सैल होवून, त्याचा फायदा भाजपला होवू शकतो. त्याचबरोबर राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी संरू असली तरी, आगामी काळात महाराष्ट्रात ईडीच्या, सीबीआयच्या कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या तर त्यात नवल वाटायला नको. त्याचबरोबर आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष येण्यास इच्छुक असला तरी, या पक्षाला सांंभाळाची आणि त्यांना किती जागा द्यायच्या, ते ठरवण्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर येवून पडणार आहे. जर आमची युती ठाकरे गटासोबत असल्यास अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर शरद पवारांवर टीकेची झोड उठवण्यास मोकळे होतील. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेणे गरजेचे आहे. दुसरीकडे एमआयएमने देखील आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढली तर, त्यांची सत्ता कुणीही रोखू शकणार नाही, असाच ट्रेंड असला तरी, या ट्रेंडला तपास यंत्रणांच्या संस्था मोडीत काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकीकडे मोर्चेबांधणी जोरात सुरू असली तरी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयारामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग वाढणार यात शंका नाही. याचबरेाबर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये फुटणारा फटाका फुसका निघाला असला तरी, तो प्रत्येकवेळीच फुसका निघेल यात शंका नाही. त्यामुळे जर हा फटाका जोरदार वाजला तर, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढू शकते. मात्र याचा पवारांना अंदाज यापूर्वीच घेतल्यामुळे पवार आपल्या खेळीने डॅमेज कंट्रोल रोखतील अशी शक्यता आहे. 

COMMENTS