महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून, केज येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून, केज येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षीही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत दहावी व बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल नोंदविला आहे.
माध्यमिक शालांत (इयत्ता दहावी) परीक्षेत अपर्णा भारत मदने हिने 93.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. विद्या मेघराज घुले हिने 92.80 टक्के गुणांसह द्वितीय तर प्रसाद बाळासाहेब थोरात याने 92.00 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. तसेच कु. राऊत अमृता अभिमान हिने 91.80 टक्के, तर कु. श्रुती रवींद्र घुले हिने 90.60 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. दहावीच्या परीक्षेत 38 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर 52 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. उच्च माध्यमिक शालांत (बारावी विज्ञान शाखा) परीक्षेत कु. माचवे धनश्री संतोष हिने 78.00 टक्के गुणांसह प्रथम, चि. दराडे अशोक बाळू याने 77.67 टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. राऊत लक्ष्मी अंकुश हिने 74.33 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. बारावी विज्ञान शाखेत 2 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर 140 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. याचबरोबर पत्रकार तात्या गवळी यांची कन्या कु. गार्गी तात्या गवळी हिने छचचड परीक्षेत यश मिळवल्याबद्दल तिचा जीवन शिक्षण संकुलाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे सचिव हारुणभाई इनामदार, संस्था सदस्य यासीन इनामदार, जीशान इनामदार, प्राचार्य दत्तात्रय हंडीबाग, मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे, बारावी विज्ञान शाखा प्रमुख हावळे सर, वस्तीगृह विभाग प्रमुख शिंदे सर, बी.एससी विभाग प्रमुख साखरे सर, तसेच बंसल क्लासेसचे प्रमुख ठोंबरे सर आणि सर्व कर्मचारीवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

COMMENTS