Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एससीमधील उपवर्गीकरण रद्द करा; ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी; आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा : अनुसूचित जाती (एससी) मध्ये उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेने तीव्र भूमिका घेत, हा निर्णय तात्काळ रद्द करण्या

कर्जतमध्ये खत-कीटकनाशक विक्रेत्यांचा बेमुदत बंद; विविध मागण्यांसाठी आंदोलन; शेतकरी अडचणीत
माकेगावात शेतीच्या वादातून चुलत्यावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढला; श्रीरामपूर, शिर्डी कोपरगावमध्ये तापमानाने ओलांडली चाळीशी!

श्रीगोंदा : अनुसूचित जाती (एससी) मध्ये उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेने तीव्र भूमिका घेत, हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मुख्य सचिव तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात संघटनेने नमूद केले आहे की, एससीमधील उपवर्गीकरणाचा निर्णय हा सामाजिक एकतेवर घाव घालणारा असून संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण होऊन सामाजिक समतोल बिघडू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. “आमच्या ताटाचे तुकडे करू नका; तुकडे झाल्यावर ते ताट राहत नाही,” अशा शब्दांत या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

संघटनेने एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी करत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, वंचित बहुजन आघाडीचे भीमराव घोडके, मुकुंद सोनटक्के, अंबादास घोडके, संजय रनसिंग, पवन रणदिवे, ऍड. विनोद उजागरे, संतोष भोसले, दादाराम रनसिंग, नितीन जावळे यांच्यासह आंबेडकरवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS