Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारने मराठा समाजाची फसवणूक ः मनोज जरांगे

स्वतंत्र नको तर ओबीसीतूनच आरक्षण हवे

जालना ः मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून, स्वतंत्र

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
कार्तिकी महापूजा मनोज जरांगेंच्या हस्ते व्हावी
सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ठाम

जालना ः मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून, स्वतंत्र आरक्षण नको तर ओबीसीतूनच आरक्षण हवे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. तसेच अधिवेशनात सगेसोयरे या मुद्द्यावर चर्चा न झाल्यास बुधवारीआंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यात 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, आम्हाला वेगळे आरक्षण नको. आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे आहे. सगे-सोयर्‍यांची अंमलबजावणी करून ओबीसीमधून आरक्षण कधी देणार ते सांगा? असा प्रश्‍न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच अधिसूचना काढल्यानंतर अंमलबजावणी का होत नाही? विशेष अधिवेशनाचा फायदाच होणार नसेल तर अधिवेशन घेतले कशाला, आम्ही ज्या मागण्या केल्या त्या संदर्भात अधिवेशन बोलवण्यात आले नाही. तुम्ही अधिसूचना काढली आणि आता त्याची अंमलबजावणी करणार नाहीत म्हणजे तुम्ही आमची फसवणूक करत आहात, असे जरांगे पाटील यानी म्हटले आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागास असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच 50 टक्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली उपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. महाराष्ट्रात मराठा समाज 28 टक्के आहे. सुमारे 52 टक्के आरक्षण असणार्‍या मोठ्या संख्येतील जाती आणि गट आधीच प्रवर्गात आहे. त्यामुळे राज्यातील 28 टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल, असेही आयोगाच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS