Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकरपंत गारडे यांचे निधन

 अहिल्यानगर : सावेडी रोड येथील आशीर्वाद बँक कॉलनी परिसरातील रहिवासी, नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी व प्रसिद्ध ज्योतिष विशारद कै. सुधाकरपं

सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! पती, सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी केलं जेरबंद
समाजात परस्पर सन्मान वाढल्यास धर्मांतर कमी होतील : रामगिरी महाराज; देवळाली प्रवरा येथे विराट हिंदू संमेलन
भोंदू बाबाच्या जाळ्यात ‘हाय-प्रोफाईल’ भक्त?; गणेश शिंदेच्या अटकेनंतर राहुरीतील भक्त संपर्क क्षेत्राच्या बाहेर

 अहिल्यानगर : सावेडी रोड येथील आशीर्वाद बँक कॉलनी परिसरातील रहिवासी, नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी व प्रसिद्ध ज्योतिष विशारद कै. सुधाकरपंत गारडे (वय 84) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  सुधाकरपंत गारडे हे वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत अनुयायी होते. सालाबादप्रमाणे ते आपल्या गुरु हरिहर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूर यात्रेत नियमित सहभागी होत असत.

 नगर अर्बन बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ज्योतिष विशारद ही परीक्षा उत्तीर्ण करून अनेक समाजबांधवांना त्यांच्या आयुष्यातील समस्यांवर मार्गदर्शन व उपाय दिले. ते उत्कृष्ट रांगोळी कलाकार म्हणूनही परिचित होते. कायम उत्साही आणि समाजाभिमुख असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

 त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंड असा मोठा परिवार आहे. पत्रकार साईराम सुधाकर गारडे व मोबाईल शॉपीचे संचालक हरिप्रसाद गारडे यांचे ते वडील होते. तसेच प्रशांत बिडकर यांचे सासरे, आणि महेश पतसंस्था अजय टकले व विनोद लड्डा यांचे ते व्याही होते.

COMMENTS