अहिल्यानगर : बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्यालयात सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील मंथन व स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. मंथन परीक्षेत अन्वी अमोल बुरूंगुले, सिया अतुल हापसे, श्रीनिवास उमाकांत फड, अनुष्का दीपक जासूद, दुर्वा सुनील मिटकरी, कार्तिक रमेश जाधव व तनिष्का आसाराम रानमोर यांनी यश मिळवले. तसेच स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत सिया अतुल हापसे, श्रीनिवास उमाकांत फड, कार्तिक रमेश जाधव व अनुष्का दीपक जासूद यांनी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना रेखा भालेराव, मंगल ढाकणे, सविता बिडवे, अतुल खांदवे, स्वाती मुरकुटे व कावेरी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. गुणगौरव सोहळ्यावेळी मुख्याध्यापक डॉ. एकनाथ मोटे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी बाळासाहेब पवार होते, तर उपाध्यक्ष बी.बी.आंधळे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करत पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. दरम्यान, मनपातर्फे आयोजित शहरस्तरीय आंतरशालेय क्रीडास्पर्धेत विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला असून सांस्कृतिक स्पर्धेतही अव्वल स्थान पटकावले आहे. क्रीडास्पर्धेसाठी लक्ष्मण माने, स्वाती पवार व अतुल खांदवे यांनी मार्गदर्शन केले, तर सांस्कृतिक स्पर्धेसाठी पुष्पा म्हस्के व नीता आगलावे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण माने यांनी केले, तर आभार प्रमोद बढे यांनी मानले.

अहिल्यानगर : बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्यालयात सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील मंथन व स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
मंथन परीक्षेत अन्वी अमोल बुरूंगुले, सिया अतुल हापसे, श्रीनिवास उमाकांत फड, अनुष्का दीपक जासूद, दुर्वा सुनील मिटकरी, कार्तिक रमेश जाधव व तनिष्का आसाराम रानमोर यांनी यश मिळवले. तसेच स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत सिया अतुल हापसे, श्रीनिवास उमाकांत फड, कार्तिक रमेश जाधव व अनुष्का दीपक जासूद यांनी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना रेखा भालेराव, मंगल ढाकणे, सविता बिडवे, अतुल खांदवे, स्वाती मुरकुटे व कावेरी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
गुणगौरव सोहळ्यावेळी मुख्याध्यापक डॉ. एकनाथ मोटे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी बाळासाहेब पवार होते, तर उपाध्यक्ष बी.बी.आंधळे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करत पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
दरम्यान, मनपातर्फे आयोजित शहरस्तरीय आंतरशालेय क्रीडास्पर्धेत विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला असून सांस्कृतिक स्पर्धेतही अव्वल स्थान पटकावले आहे. क्रीडास्पर्धेसाठी लक्ष्मण माने, स्वाती पवार व अतुल खांदवे यांनी मार्गदर्शन केले, तर सांस्कृतिक स्पर्धेसाठी पुष्पा म्हस्के व नीता आगलावे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण माने यांनी केले, तर आभार प्रमोद बढे यांनी मानले.

COMMENTS