Homeताज्या बातम्या

कुख्यात घायवळ टोळीचे मोक्कातील फरार आरोपी जेरबंददोघे ताब्यात ; कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे सापळा

कर्जत : पुणे येथील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आणि मोक्का गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने क

राहुरी गोळीबार प्रकरणातील आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद; मुळा धरण परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
अखेर खरातवर ईडीने केला गुन्हा दाखल; उत्पन्नाचा आणि गैरव्यवहाराचे स्त्रोत शोधणार
अहिल्यानगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या हत्याकांडाच्या घटना; राहुरीत कर्मचाऱ्याचा तर श्रीरामपूरमध्ये मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून


कर्जत : पुणे येथील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आणि मोक्का गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव शिवरामधून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
 याबाबत माहिती अशी की, खर्डा (ता. जामखेड) येथील एका व्यक्तीकडे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर (वय २७, रा. खर्डा, ता. जामखेड) हा कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी यड्राव फाटा परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर दुसरा फरार आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे (वय ४०, रा. खेचरे, ता. मुळशी, जि. पुणे) हा कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही सोलापूर-अहिल्यानगर महामार्गावरील उड्डाणपुलाखालून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस तपासात रोहित गोलेकर याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे सात तर ज्ञानेश्वर तोंडे याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही आरोपी पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित असल्याची माहितीही समोर आली आहे. आरोपी रोहित गोलेकर याला पुढील तपासासाठी खर्डा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, ज्ञानेश्वर तोंडे याला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने केली.

COMMENTS