टाळेबंदीचे काही निर्बंध हटवणार ; एक जूनपासून कार्यवाही; काही राज्यांचा होणार अपवाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाळेबंदीचे काही निर्बंध हटवणार ; एक जूनपासून कार्यवाही; काही राज्यांचा होणार अपवाद

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने अनेक राज्यात लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक दिवसांनी पुन्हा एकदा अनलॉकच्या दिशेने देश वाटचाल करत आहे.

घायतडकर दाम्पत्याचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोलाचे – पोलिस निरीक्षक देसले
वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
दुहेरी हत्याकांड करून झाले फरार.. पोलिसांनी आवळल्या मुसक्या l पहा LokNews24

नवी दिल्लीः  देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने अनेक राज्यात लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक दिवसांनी पुन्हा एकदा अनलॉकच्या दिशेने देश वाटचाल करत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेशासह अनेक राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या अशीच घटत राहिली तर एक जूनपासून निर्बंधांमध्ये सूट देण्याचे संकेत दिले आहेत; परंतु काही राज्यात या निर्बंधात कोणतीही सूट मिळणार नाही. 

    दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने 31 मे पर्यंत टाळेबंदी वाढविली आहे. 31 मे च्या पहाटे पाच वाजेपर्यंत  टाळेबंदी असेल. दिल्लीत 19 एप्रिलपासून टाळेबंदी लावण्यात आली आहे. रुग्णसंख्येत घट झाली, तर 31 मेनंतर अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रेट 36 टक्क्यावरून आता 2.5 टक्क्यापर्यंत पोहचला आहे. मागील 24 तासात एक हजार 649 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम राहिली तर टप्प्याटप्प्याने निर्बंधात सूट देणार आहोत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. राज्य सरकारने 14 एप्रिलनंतर राज्यभरात कडक निर्बंध लागू केले होते. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 30 हजारांनी कमी झाली. रविवारी दिवसभरात राज्यात 26 हजार 672 कोरोना रुग्ण आढळले. मध्य प्रदेशात अनेक दिवसांनी अनलॉकला सुरुवात झाली आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांत शिथिलता आणली आहे. ज्या जिल्ह्यात सूट देण्यात आली आहे, तेथे संक्रमणाचे प्रमाण कमी झाले आहे. याच आधारावर उर्वरित जिल्ह्यात एक जूनपासून सवलत देण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. आम्ही टाळेबंदी कायम ठेवू शकत नाही. एक जूनपासून आम्हाला हळूहळू अनलॉक करावे लागेल. सूट असेल पण पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर, कोचिंग सुरू होण्याची शक्यता नाही. एक जूनपासून सरकारी कार्यालये सुरू होतील; पण त्यातही 25 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती असेल, असे सूतोवाच त्यांनी केले आहे.

    उत्तर प्रदेशमध्ये टाळेबंदी 31 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. शहरी भागात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, तसेच बरे होणार्‍यांचे प्रमाणही वाढले आहे; परंतु ग्रामीण भागात वाढणार्‍या संख्येने सरकार चिंतेत आहे. कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत; परंतु आता काळ्या बुरशीचे प्रकार वाढत आहेत. कानपूर, लखनऊ, मथुरा, वाराणसीसह अनेक जिल्ह्यात काळ्या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत. येत्या आठवड्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी झाली, तर तिथे सूट दिली जाऊ शकते. तामिळनाडूमध्ये कोणत्याही सवलतीशिवाय टाळेबंदी एक आठवड्यासाठी वाढविण्यात आला आहे. केवळ पूर्वीच्या परवानगी असलेल्या हालचालींना सूट दिली जाईल. केरळमध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी टाळेबंदी 30 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमधील पॉझिटिव्हचे प्रमाण 23.18 आहे, जे लॉकडाऊन सूटसाठी अंदाजे 5 टक्क्यापेक्षा हे जास्त आहे. कर्नाटक सरकारने राज्यात 7 जून रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत टाळेबंदी वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी केली. टाळेबंदीच्या नियमांचे पालन केले नाही, तर पोलिस त्यांच्याविरूद्ध कारवाई करतील. कर्नाटकात पाच लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सुमारे तीन लाख प्रकरणे एकट्या बंगळूरमध्ये आहेत. राजस्थानमध्ये आठ जूनपर्यंत टाळेबंदी वाढविण्यात आली आहे.

टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील होणार

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने एक जूननंतर टाळेबंदी वाढणार की नियमांमध्ये सूट मिळणार यावर लोकांचे लक्ष आहे. आरोग्यमंत्री राजेश टोप तसेच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येणार्‍या काळात काही निर्बंधात सूट दिली जाईल, असे संकेत दिले आहेत. दरम्यान, राज्यातील व्यापार्‍यांनी कोरोनाचे नियम पाळू; परंतु व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्या, अशी विनंती राज्य सरकारला केली आहे. त्याचबरोबर निर्बंध उठविले नाहीत, तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS