तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी आता सं

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी आता संपुष्टात आल्याची घोषणा केली आहे. यापुढे इराणशी कोणत्याही नव्या तडजोडीचा किंवा कराराचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी अमेरिकेने इराणमधील 80 हून अधिक लष्करी ठिकाणांवर व्यापक हवाई हल्ले केल्याची माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे.
आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेदरम्यान बोलताना ट्रम्प यांनी इराणच्या कारवायांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला. इराणकडून कोणताही हल्ला झाला, तर त्याला त्याहून अधिक ताकदीने उत्तर दिले जाईल. आमच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्या घटकांना आम्ही लक्ष्य केले असून, भविष्यातही अशीच भूमिका कायम राहील, असे त्यांनी सांगितले. इराणचा अणुकार्यक्रम निष्प्रभ करणे हे अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तसेच इराणविरोधातील कारवाईत अपेक्षित सहकार्य न केल्याबद्दल त्यांनी उत्तर अटलांटिक करार संघटनेबद्दलही नाराजी व्यक्त केली. इराण हा जगातील दहशतवादी कारवायांना सर्वाधिक पाठबळ देणार्या देशांपैकी एक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

COMMENTS