सर्व भाविक भक्तांना आध्यात्मिक आनंदाची पर्वणी ठरणारा 5 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव कपिलधारवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. लक्ष्मण महाराज

सर्व भाविक भक्तांना आध्यात्मिक आनंदाची पर्वणी ठरणारा 5 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव कपिलधारवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली श्री वाघेश्वरी मातांच्या कलशारोहणा वर्धापन दिनानिमित्त हा महोत्सव संपन्न होत आहे.
हा कीर्तन महोत्सव शनिवार दि. 25 एप्रिल 2026 ते बुधवार दि. 29 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार आहे. दररोज सकाळी काकडा भजन, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर असा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या दरम्यान विविध नामांकित कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. शनिवार दि. 25 एप्रिल रोजी ह.भ.प. गणेश महाराज अस्वले बंकटस्वामी मठ संस्थान नेकनुर, रविवार दि. 26 एप्रिल रोजी ह.भ.प. शुभम महाराज वसंतगडकर, सोमवार दि. 27 एप्रिल रोजी ह.भ.प. मनीषाताई डांगे सोनेसांगवी पुणे, तर मंगळवार दि. 28 एप्रिल रोजी ह.भ.प. भाग्यश्री मोहिते परभणी यांची कीर्तने सेवेचे आयोजित करण्यात आली आहेत. बुधवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी10 ते 12 या वेळेत ह.भ.प. गुरु. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून या पाच दिवसीय कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या महोत्सवासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ह.भ.प. श्री हरिहारनंद भारती महाराज(मोरेश्वर संस्थान कोळवाडी), विश्वनाथ आप्पा सलगर (श्रीक्षेत्र कपिलधार), दत्त उपासक वैजिनाथ महाराज शिंदे(श्री दत्त संस्थान बालाघाट) यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच हरिपाठ, भजन, वाद्य व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्येही अनेक कीर्तनसेवक सहभागी होणार आहेत. हा भव्य कीर्तन महोत्सव समस्त वाघेश्वरी तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ, कपिलधारवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS