नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आलेल्या जीपीएटी 2026 (ग्रॅज्युएट फार्मसी प्टिट्यूड टेस्ट) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षे

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आलेल्या जीपीएटी 2026 (ग्रॅज्युएट फार्मसी प्टिट्यूड टेस्ट) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षेत बीडच्या आदित्य फार्मसी कॉलेजने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या कठीण परीक्षेत महाविद्यालयातील तब्बल सात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये येलदेपवाड व्यंकटरामन प्रकाश, संतोष दत्ताराव गवळी, संग्रामसिंह दशरथ भाटेकर, ज्ञानेश्वर विश्वंभऱ विघ्ने, खुशी वीरेंद्र यादव, ओंकार उद्धवराव डाके आणि ओंकार मछिंद्र जगताप यांचा समावेश आहे. या यशाबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा तसेच संचालक डॉ. आदित्य सारडा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जीपीएटी ही परीक्षा फार्मसी क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ‘नायपर’ सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेशाची संधी मिळते, तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा मार्गही मोकळा होतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आज खरे चीज झाले आहे. तर प्राचार्य डॉ. कुमार सुरवसे म्हणाले, जीपीएटी सारखी स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर सिद्ध होणे होय. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे. भविष्यातही अशीच कामगिरी कायम ठेवावी, अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

COMMENTS