प्रा.प्रदीप रोडे यांनी निस्वार्थ सेवाभाव, नैतिकता, शील आणि सदाचार या मूल्यांच्या आधारावर उभारलेले तुलसी शैक्षणिक संकुल आज सामाजिक परिवर्तनाचे प्र

प्रा.प्रदीप रोडे यांनी निस्वार्थ सेवाभाव, नैतिकता, शील आणि सदाचार या मूल्यांच्या आधारावर उभारलेले तुलसी शैक्षणिक संकुल आज सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान ठरले आहे. केवळ पैशाने नव्हे, तर समाजासाठी वेळ, बुद्धी आणि संपत्ती खर्च केल्यानेच खरे यश प्राप्त होते. प्रा.प्रदीप रोडे यांनी आपल्या कार्यातून हाच आदर्श समाजासमोर उभा केला आहे, असे प्रतिपादन पुज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी केले.
देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या नूतन इमारतीचे तसेच ’तुलसी क्रिएशन – द कम्प्लीट वुमन्स ड्रीम वर्ल्ड’ या शोरूमचे उद्घाटन रविवारी (दि. 3 मे) मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी ते मुख्य उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ पूज्यनीय भिक्खू संघाच्या मंगल मैत्रीत आणि बुद्धवंदनेने झाला. यावेळी पुज्य भदंत करुणानंद महाथेरो आणि पुज्य भदंत धम्मशील थेरो यांनी मंगल आशीर्वाद दिले. या ऐतिहासिक सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा.रवींद्र जोगदंड, मा.दीपक कदम, मा.डॉ. सिद्धार्थ जोंधळे, मा.सुरेश लोंढे, मा.सुदिन गायकवाड, मा.सुधाकर बनटे, मा.संदीप उपरे, मा.पी.टी .मुने, मा.रविंद्र कोलप, मा.दीपा रोडे तसेच प्राचार्या डॉ.अश्विनी बेद्रे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पुज्य भदंत करुणानंद महाथेरो म्हणाले की, प्रा.प्रदीप रोडे यांच्या हातून आदर्श शैक्षणिक कार्य घडत आहे. त्यांच्या नावातच ’प्रदीप’ म्हणजे प्रकाश आहे. भगवान बुद्धांच्या ’अत्तदीपो भव’ या संदेशाप्रमाणे त्यांनी स्वतः प्रकाशमान होत असंख्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित केला आहे. त्यांचा सात्विक स्वभाव आणि समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी आहे, असे म्हणाले. तर, पुज्य भदंत धम्मशील थेरो यांनी प्रा. प्रदीप रोडे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे कौतुक केले. शून्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास कष्ट, परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला आहे. प्रचंड गरिबीत शिक्षण घेत त्यांनी शिकणार्यापासून शिकवणार्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास घडविला, असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवर मा.रवींद्र जोगदंड, मा.अशोक शिरसे, मा.सुरेश लोंढे आणि मा.दीपक कदम यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त करत तुलसी शैक्षणिक संकुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रदीप रोडे यांनी संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत विविध शैक्षणिक, कौशल्यविकास आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांकडे स्किल आणि विल असेल, तर तो जगाच्या पाठीवर कुठेही स्वाभिमानाने, अभिमानाने आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभा राहू शकतो. विशेषतः मुलींना सशक्त, स्वावलंबी आणि उद्योजक बनविणे हेच आमचे ध्येय आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अंकुश कोरडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रो.डॉ. मनोहर शिरसाट यांनी केले, तर आभार प्रा विद्या अवघडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समूहातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. या भव्य सोहळ्यास बीड जिल्ह्यासह परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS