Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उद्या जिल्हाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक

शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मांडलेल्या विविध मागण्यांची दखल घेत जिल्हाधिकारी श्री. विवेक ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
परमार्थात शुद्ध भक्तीनेच भगवंत प्राप्ती : ह.भ.प. आढाव
तामिळनाडू एस‌आय‌आर’ विरोधात ठाम !



शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मांडलेल्या विविध मागण्यांची दखल घेत जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी उद्या (दि. 23 एप्रिल) सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.
ही बैठक जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, दिव्यांग कर्मचार्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांवर सर्वंकष चर्चा करून ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), जिल्हा शल्य चिकित्सक, स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी दि. 16 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या 12 कलमी निवेदनात दिव्यांग कर्मचार्‍यांच्या पदोन्नती, सेवा अटी, कार्यालयीन प्रवेश सुलभता, रॅम्प, विशेष शौचालये, वैद्यकीय सुविधा आदी महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश होता. या बैठकीस संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले, जिल्हाध्यक्ष अजिनाथ हाडोळे, सचिव दिनेश गाडे, श्याम दासरे, शेख बिबन, शेख युसुफ, बालासाहेब कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयुक्त प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. दिव्यांग कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS