Homeताज्या बातम्या

बदनामीचे राजकारण थांबवा : वडेट्टीवारपक्षांतराच्या अफवांना दिला पूर्णविराम

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षांतराच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत, आपण काँग्रेसच्या विचारसरणीशी निष्ठावान

4 हजार 250 कोटींचा हेलिप्लांट प्रकल्प हवेतच ?उद्योगमंत्री उदय सामंतांच्या वक्तव्याने नांदेडमध्ये राजकीय भूकंप
मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करणार; मंत्री विखे-पाटील यांची घोषणा
कुणाच्या सर्टिफिकेटची शिवसेनेला आवश्यकता नाही – उदय सामंत | LOKNews24


मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षांतराच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत, आपण काँग्रेसच्या विचारसरणीशी निष्ठावान असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे. आपल्याबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचे स्वागत केले जाईल, असे वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने दिलेली प्रत्येक जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली असून पक्षाशी असलेली बांधिलकी कायम आहे. महायुती सरकारच्या धोरणांवर टीका केली की, आपल्या विरोधात खोट्या बातम्या आणि निराधार चर्चा सुरू होतात, असा दावा त्यांनी केला. पक्ष बदलणार, शिंदे गटात जाणार किंवा विविध नेत्यांशी गुप्त भेटी घेतल्याच्या चर्चा तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्ता किंवा पदासाठी आपल्या विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. माझी भूमिका स्पष्ट असून मी काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. काही माध्यमांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, ठोस माहिती नसताना अफवांवर आधारित प्रश्‍न उपस्थित करून समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. ही भूमिका पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना धरून नसल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि पायाभूत सुविधांसारख्या गंभीर प्रश्‍नांवर चर्चा होणे आवश्यक असताना, अफवांच्या माध्यमातून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीतील कोणताही नेता शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे स्वागतच केले जाईल, असे मत व्यक्त केले. मात्र, कोणत्याही प्रकारचे राजकीय तोडफोडीचे प्रयत्न सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सामंत यांनी हा विषय अधिक वाढवू नये, असे आवाहन केले. संबंधित वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS