पवित्र हज यात्रेसाठी सन 2027 मध्ये जाणार्या बीड जिल्ह्यातील इच्छुक यात्रेकरूंसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. हज 2027 साठी अर्ज (फॉर्म) भर

पवित्र हज यात्रेसाठी सन 2027 मध्ये जाणार्या बीड जिल्ह्यातील इच्छुक यात्रेकरूंसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. हज 2027 साठी अर्ज (फॉर्म) भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून, इच्छुक नागरिकांनी वेळेत अर्ज भरून आवश्यक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन खिदमाते हुज्जाज (हज कमिटी बीड) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हज यात्रेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 29 जून 2026 पासून सुरू होऊन 20 जुलै 2026 पर्यंत चालणार आहे. अर्ज भरण्यासाठी मिना फंक्शन हॉल, नर्सरी रोड, बीड येथील हज कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेकरूंची सोय लक्षात घेऊन हज फॉर्म भरण्याची ऑनलाइन सुविधा बीड शहरात दोन ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाइन अर्ज भरण्याची ठिकाणे : मिना फंक्शन हॉल, नर्सरी रोड, बीड सेफ्टी लाईट हाऊस, नगर परिषद एरिया, बीड अधिक माहितीसाठी संपर्क : हाजी मुजम्मिल – 9372461917, हाजी जमील भाई – 9970532168, हाजी फरीद सर – 9096180041, हाजी निजाम भाई – 9422650949 हज अर्ज ऑनलाइन पद्धतीने कुठूनही भरता येणार असला तरी अर्ज भरल्यानंतर त्याची नोंद हज रजिस्टरमध्ये करणे आवश्यक असल्याचे हज कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे. हज रजिस्टर नोंदणीची व्यवस्था मिना फंक्शन हॉल, बीड येथे करण्यात आली असून नोंदणीची वेळ पुढीलप्रमाणे राहणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत दुपारी 3.00 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत सन 2027 च्या हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या सर्व बांधवांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून हज कार्यालयात नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन हज कमिटी बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS