Homeताज्या बातम्या

साक्षात भगवंताला कीर्तनासाठी उभे केले ही किमया माऊली दादाची-मुंडे महाराज शास्त्रीहरी कीर्तनाने भक्तिमय झाली चाकरवाडी

आपल्या नामस्मरण अन्नदान या तपश्चर्येवर साधनेवर आणि जड जीवांच्या उद्धारकल्याणाची आहारनिष ध्यास चिंता वासल्य भावनेने वाहणार्‍या माऊली यांनी एकाच दि

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोपरगावात उत्साहात
ईश्वर मानायचा नाही तर जाणायचा – सुश्री वैष्णवी भारतीजी
वारकरी संप्रदायात परिवर्तनाची घडी संत बंकटस्वामी यांनी बसवली – श्री ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्रीपुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प मोठ्या थाटात संपन्न



आपल्या नामस्मरण अन्नदान या तपश्चर्येवर साधनेवर आणि जड जीवांच्या उद्धारकल्याणाची आहारनिष ध्यास चिंता वासल्य भावनेने वाहणार्‍या माऊली यांनी एकाच दिवशी दोन गावी कीर्तन करून भगवंताला कीर्तनासाठी उभे केले ही किमया व ताकत माऊलींची होती असे चिंतन ह भ प श्री मुंडे महाराज शास्त्री यांनी मांडले.
मंगळवार दिनांक 23 जून रोजी 26 व्या पुण्यस्मरण सोहळ्यात श्रीक्षेत्र चाकरवाडी येथील माऊलींच्या समाधी स्थळी कीर्तन सेवेत श्री मुंडे महाराज बोलत होते. सेवेकरीता, बोलो अबोलणे मरूनिया जीने , अश्विनी नसणे जनी आम्हा , भोगी त्याग जाला संगीच असंग, तोडीयेले लाग माग दोन्ही , तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा , पुसणे ते पुसा पांडुरंगा  या अभंगावर अत्यंत अभ्यासपूर्ण व परखड अस्कलित चिंतन मांडताना माऊलींच्या जीवन कार्याशी या अभंगाचा अन्वयार्थ जुळवून त्यांच्या कार्याची महती ही चंद्र सूर्य असेपर्यंत टिकेल नवे ती वृद्धिंगत होईल असे स्पष्ट केले  माऊलींच्या पश्चात शुद्ध प्रामाणिक प्रेमयुक्त श्रद्धायुक्त अंतकरणाने माऊलींचा विचार शिकवण तत्व यांचे स्वतः आचरण करून आलेल्या भक्तांना माऊली प्रमाणे वासल्य प्रेम देत भक्तीचा मूलमंत्र देण्यासाठी उत्तरेश्वराची सेवा करणारे श्री नारायण महाराज भाऊ आणि चाकरवाडीत माऊलींच्या समाधीची सेवा अखंड करणारे श्री महादेव महाराज माऊली तात्या ही दोन रत्न कीर्तीवंत तर आहेतच पण जगी ऐसा बाप व्हावा जया वंश सिद्धी जावा याप्रमाणे माऊलींच्या पश्चात  चाकरवाडीचे नव्हे तर सर्व भागवत संप्रदायाचे वैभव यामुळे वाढल्याचे सांगितले  माऊलींनी एकाच तारखेस एकाच दिवशी दोन गावी कीर्तन सेवा केल्याचे ज्ञात आहे खरे तर विस्मरणाने दोन गावांना तारीख दिली होती पण प्रत्यक्षात माऊलींनी एका गावात कीर्तन केले पण जिथे दुसर्‍या गावासाठी कीर्तनाची तारीख निश्चित होती तिथे माऊलींच्या रूपाने साक्षात परमात्मा परमात्मा पांडुरंगाने स्वतः उपस्थित राहून माऊलींच्या कीर्तनाची सेवा परिपूर्ण केली हा साक्षात्कार केवळ त्यांच्या निसिम भक्ती साधनेची फळ असल्याची सांगितले  ज्ञानोबारायांच्या सर्वधर्मसमभाव बंधुभाव एकरुपता व भेदाभेद विहिरीत भक्ती स्वरूप म्हणजे माऊली दादा होते. इथे येणारा प्रत्येक माणूस आनंद समाधान सुख व तृप्तता पदरी घेऊन धन्य होतो असे महाराजांनी स्पष्ट केले.

COMMENTS