Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकास जीवदान देणार्‍या तीन साहसी युवकांचा सत्कार

इस्लामपूर : आशिष दुग्गे, विशाल जाधव, निलेश डांगे या तीन साहसी वीरांचा सत्कार करताना माजी मंत्री आ. जयंत पाटील. समवेत खंडेराव जाधव, सचिन कोळी, पांडुरं

इस्लामपूरच्या राजश्री पाटील हिने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ’किली मांजारो’ शिखरावर फडकविला तिरंगा
मुलांच्या दिल्ली, ओरिसा, गुजरात; मुलींच्या हरियाणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशचे संघ विजयी
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा पुन्हा संघात

इस्लामपूर / प्रतिनिधी : तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकास जीवदान देणार्‍या तीन साहसी युवकांचा माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते इस्लामपूर येथील बाणेकर अपार्टमेंटमध्ये सत्कार करण्यात आला. आशिष प्रदीप दुग्गे, विशाल पोपटराव जाधव, निलेश सोपान डांगे अशी या साहसी युवकांची नावे आहे. यावेळी माजी सभापती खंडेराव जाधव, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन कोळी प्रामुख्याने उपस्थित होते.
इस्लामपूर येथील 37 वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी मंडई परिसरातील मंत्री कोट तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तीन साहसीवीरांनी तलावात उड्या मारून या युवकास तलावातून बाहेर काढून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सध्या या साहसी युवकांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
आ. पाटील म्हणाले, या तिन्ही युवकांनी आपला जीव धोक्यात घालून एका युवकास जीवदान दिले आहे. या युवकांचे साहस कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी राजेंद्र बाणेकर, पांडुरंग आस्वले, श्रीकांत आस्वले, प्रदीप सराफदार, संजय तेवरे यांच्यासह परिवारातील युवक व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS