Homeताज्या बातम्या

कर्जमाफीत सरकारने शेतकर्‍यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने  नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी

बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्‍यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह

महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 


बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्‍यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोहित  पवार व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना दिलेला शब्द सरकारने पाळला नाही. या लबाड सरकारने पुन्हा शेतकर्‍याची निराशा केली सरकार एकीकडे अदाणी – अंबानी सारख्या अब्जाधीश करोडपतीची अब्यावधी रुपयांची विनाअटी कर्जमाफी करत आहे. परंतु शेतकर्‍याला कर्जमाफी देताना अटी शर्ती च्या नावाखाली फसवण्याचे काम लबाड सरकारने केले आहे. असे प्रतिपादन शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड जिल्ह्यातील नागपूर खुर्द या ठिकाणी फसव्या कर्जमाफीच्या जीआरपी होळी करताना  राजेंद्र आमटे यांनी केले.
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून गावोगावी फसव्या कर्जमाफी जीआर ची होळी केली जात आहे. जोपर्यंत शेतकर्‍याचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शेतकरी हक्क मोर्चा गावोगावी जाऊन शेतकर्‍याची जनजागृती करण्याचं काम करत आहे. तसेच बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टी होऊनही पीक विमा मिळालेला नसून या पिक विमा संदर्भात सरकार विरोधात जागृती अभियान राबवण्याचे काम शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील नागपूर खुर्द या ठिकाणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, विक्रम साळुंके, रामेश्वर साळुंके, राजाभाऊ साळुंके, खाजाभाई पठाण, जालिंदर साळुंके, राजेश साळुंके, अक्षय साळुंके,जयराम साळुंके, बाळकृष्ण साळुंके, बाबुलाल साळुंके, धर्मराज साळुंके, रामेश्वर साळुंके, राजकुमार साळुंके, प्रकाश जोंजाळ, गुलाब पठाण, दगडू साळुंके, सीताराम साळुंके, रफिक पठाण, बळी साळुंके, अय्याज पठाण, उद्धव साळुंके, वशिष्ठ साळुंके, सागर , गंगा, हनुमान साळुंके आदी शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS