नात्याला काळिमा…काकाने केला पुतणीचा विनयभंग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नात्याला काळिमा…काकाने केला पुतणीचा विनयभंग

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चुलत्याने पुतणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. शहराच्या मध्यवर्

श्रीगोंद्यात आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन
तुकाई’ प्रकल्प प्रलंबित ठेवणार्‍यांवर कारवाई होणार !
जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चुलत्याने पुतणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात राहणार्‍या एका 24 वर्षीय युवतीचा तिच्या चुलत्यानेच विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी (15 जुलै) दुपारी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडित युवती तिची आजी, आई व चुलत्याबरोबर शहरात राहते. शुक्रवारी सकाळी तिची आई बाहेर गेलेली असताना ही युवती व चुलते दोघेच घरात होते. त्यावेळी चुलत्याने युवतीचा विनयभंग करून बलात्कार करण्याची तसेच याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित युवतीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने चुलत्याला जाब विचारला. यावेळी चुलत्याने तिच्या आईला लाथाबुक्क्याने मारहाण करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS