Homeताज्या बातम्या

शासनाच्या योजना शेवटपर्यंत पोहोचवणे हेच पुण्याचे कार्य; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे कोपरगावमधील मेळाव्यात प्रतिपादन

कोपरगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना

कोपरगाव येथे पाच दिवसीय योग उत्सव उत्साहात; नियमित योगाभ्यास करण्याचे विद्यार्थ्यांन आवाहन
मनपा शाळेमध्ये वाचक विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याचा सृजनशील उपक्रम
मध्य प्रदेशातील भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या चौघांचा मृत्यू; दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील घटना

कोपरगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राज्यात सर्वसामान्य, दीनदलित, आदिवासी आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी कोपरगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयामार्फत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या विविध लाभार्थी योजनांना मी पुण्याचे कार्य मानते. एकवेळ मंदिरात जाणे राहिले तरी चालेल, मात्र गोरगरिबांचे अश्रू पुसता आले पाहिजेत, त्यापेक्षा मोठे पुण्याचे दुसरे कोणतेही कार्य असू शकत नाही, असे प्रतिपादन माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.

कोपरगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने कुंभारी येथे गुरुवारी (दि. २५) विविध लाभार्थी योजनांअंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव कदम होते. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, दीपकराव चौधरी, बापूसाहेब पवार, ज्ञानेश्वर चिने, भागवत कदम, पंढरीनाथ कदम, नरेंद्र कदम, मारुती कदम, सुरेश चतुर यांच्यासह ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना कोल्हे म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयात जावे लागते, मात्र अनेकदा तेथे गेल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आजही अनेक सरकारी योजना अस्तित्वात असल्या तरी त्यांचा लाभ अनेक गरजूंपर्यंत पोहोचत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना दरमहा हक्काची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली असून ही योजना राज्यात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रत्येकाला स्वतःचे घर मिळावे यासाठी घरकुल योजनेसह शासनाकडून अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब जनतेची स्वप्ने पूर्णत्वास यावीत, हाच शासनाचा मूलभूत हेतू असून शासनाचे कार्य पूर्ण करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते नेहमी प्रयत्नशील असतात, असे कोल्हे यांनी सांगितले.

COMMENTS