Homeताज्या बातम्या

कर्जत तालुक्यात ‘पल्स पोलिओ’ मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज; २२ हजार ९९६ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट

कर्जत: कर्जत तालुक्यात आगामी ‘पल्स पोलिओ’ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुकास्तरीय कृती समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ० ते ५

दारू वाहतूक करणारी वाहने लुटणारी टोळी पकडली
मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेबाबत फलक लावून निषेध
उत्पादनखर्च २२०० पण भाव फक्त ९००; महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत!
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी; पुणे जिल्ह्यात ४ लाख ५३  हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे डोस देणार | My Marathi

कर्जत: कर्जत तालुक्यात आगामी ‘पल्स पोलिओ’ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुकास्तरीय कृती समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देऊन तालुका पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी केले आहे.

तहसीलदार रवी सतवण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कर्जत तालुक्यातील पल्स पोलिओ मोहिमेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यंदाच्या मोहिमेत तालुक्यातील ० ते ५ वयोगटातील तब्बल २२ हजार ९९६ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेसाठी तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या २५१ पोलिओ बूथद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे पोलिओ बूथ सुरू राहणार असून, सर्व पालकांनी आपल्या मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीत पोलिओ लस पूर्णतः सुरक्षित, प्रभावी आणि बालकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच पोलिओमुक्त भारत घडवण्यासाठी पालकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे आणि वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती भारती यांनी मोहिमेचे नियोजन, पूर्वतयारी आणि अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली. मोहिमेनंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस घरभेटीद्वारे विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीस गट विकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षण विभाग आणि बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS