Homeताज्या बातम्या

आरक्षण वाचवण्यासाठी २६ जूनला चैत्यभूमीवर उपस्थित राहा; उपवर्गीकरणाला विरोध करण्याचे अ‍ॅड. तेजस वडमारे यांचे आवाहन

बीड: अनुसूचित जाती आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या बीड ते मुंबई लाँग मार्चचा समारोप २६ जून रोजी दादर येथील चैत

ग्राहक पंचायत महाराष्ट्र गेवराई शाखेच्या बैठकीत जनहिताचे ११ ठराव संमत; ठेवीदारांचे पैसे, पाणी आणि स्मार्ट मीटर प्रश्नांवर लढा तीव्र करणार
कुंभमेळा निधी गैरव्यवहारात सरकारकडून अभय कशासाठी? २२७० कोटींच्या कामांतील निविदांच्या निर्णय प्रक्रियेत मनिषाताई म्हैसकरांची भूमिका संशयास्पद
व्यावसायिक गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त; १ ऑगस्टपासून नवे दर लागू, घरगुती गॅसचे दर मात्र जैसे थे

बीड: अनुसूचित जाती आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या बीड ते मुंबई लाँग मार्चचा समारोप २६ जून रोजी दादर येथील चैत्यभूमीवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अ‍ॅड. तेजस वडमारे यांनी केले आहे.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणार्‍या या समारोप कार्यक्रमात राज्यभरातील आंबेडकरी समाजबांधव सहभागी होणार आहेत. उपवर्गीकरणाचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत भावनेच्या विरोधात असल्याचा आरोप करत हा लढा कोणत्याही जातीविरोधात नसून संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी असल्याचे अ‍ॅड. वडमारे यांनी सांगितले.

अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जातींना एकत्रित घटक म्हणून संविधानात स्थान देण्यात आले असून, अ, ब, क, ड अशा उपवर्गांमध्ये विभाजन करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरक्षण, सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी २६ जून रोजी चैत्यभूमीवर शांततापूर्ण उपस्थिती लावण्याचे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS