पाटोदा: तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत मागील पावसाळ्यात कोसळली होती. मात्र, आता वर्ष उलटून गेले तरीही प्रशासनाकडून य

पाटोदा: तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत मागील पावसाळ्यात कोसळली होती. मात्र, आता वर्ष उलटून गेले तरीही प्रशासनाकडून या भिंतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे चिंचोली येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील पावसाळ्यात ही भिंत कोसळल्यापासून विद्यार्थी उघड्यावर किंवा असुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्यास भाग पडत आहेत. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर आणि अक्षम्य दुर्लक्षावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तीव्र सवाल उपस्थित केले आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाने याकडे पाठ फिरवल्याने पालकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या शाळेच्या भिंतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

COMMENTS