Homeताज्या बातम्या

बीड शहरातील वीज समस्यांवर अ‍ॅड. संध्याताई राजपूत यांनी अधीक्षक अभियंत्यांची घेतली भेट

बीड: शहरातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, लो-व्होल्टेज समस्या, लोंबकळणार्‍या वीज तारा आणि उघडे डीपी बॉक्स यांसह विविध वीज समस्यांबाबत भाजप मह

संस्कारच्या चिमुकल्यांनी केला विठ्ठल नामाचा जयघोष; संस्कार विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी
नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात १३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल; सीबीआयकडून तब्बल २० हजार पानांचा तपशील न्यायालयात सादर
मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली दिपके कुटुंबियांची भेट; अभिजीत यांच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करणार

बीड: शहरातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, लो-व्होल्टेज समस्या, लोंबकळणार्‍या वीज तारा आणि उघडे डीपी बॉक्स यांसह विविध वीज समस्यांबाबत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव अ‍ॅड. संध्याताई राजपूत यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.

यावेळी त्यांनी शहरातील नागरिक व व्यापार्‍यांना भेडसावणार्‍या विविध वीज समस्यांकडे प्रशासनाचे तीव्र लक्ष वेधले. सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, महावितरणने या तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांनी या सर्व समस्या सकारात्मकतेने ऐकून घेत लवकरच आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी महावितरण तत्पर राहील, असे आश्वासन दिले.

COMMENTS