Homeताज्या बातम्या

सौर ऊर्जा, जलसंधारणातील कामांची दखल; तिगावच्या सरपंच अर्चना राज पाटील यांना लोकमत सरपंच अवॉर्ड 2026

वडवणी: वडवणी तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अर्चना राज पाटील यांना लोकमत सरपंच अवॉर्ड 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीडचे

कुंभमेळ्याच्या २२७० कोटींच्या निधीमध्ये कोट्यवधींची लूट; मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमावी
इराणचा अमेरिकेवर बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ल्याचा आरोप; अमेरिका-इराण तणावामुळे जगाचे टेन्शन वाढले
शेवगाव नगर परिषद कार्यालयाच्या नव्या वास्तूचे लोकार्पण; मुंढे- लांडे एकत्र आल्याने राजकारणात नवी समीकरणे? बहुतेक नगरसेवकांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

वडवणी: वडवणी तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अर्चना राज पाटील यांना लोकमत सरपंच अवॉर्ड 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, दैनिक लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामुळे तिगावच्या सर्वांगीण विकासाला राज्यस्तरीय पावती मिळाली आहे.

तिगाव ग्रामपंचायतीने सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून गावातील पाणीपुरवठा विहिरीवरील सोलार पंप, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच सार्वजनिक ठिकाणी सौर पथदिवे उभारले आहेत. यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची विविध कामे राबवून गाव टँकरमुक्त करण्यात आले आहे. पाच तांडे आणि आठ वस्त्यांमध्ये विखुरलेल्या गावात रस्ते, वीज व पाणी सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यात सरपंच अर्चना पाटील यांचे योगदान राहिले आहे.

या सर्व उल्लेखनीय विकासकामांची दखल घेत दैनिक लोकमत बीडच्या वतीने त्यांना सरपंच अवॉर्ड 2026 देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल सरपंच अर्चना राज पाटील यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील, तसेच विविध मान्यवर, सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS