Homeताज्या बातम्या

जागतिक योग दिनानिमित्त भाजपा नांदेड महानगरचे भव्य योग शिबिर; 500 हून अधिक योगसाधकांचा  सहभाग

जागतिक योग दिनानिमित्त भाजपा नांदेड महानगरच्या वतीने श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपा नांदेड महानगरचे

अशोकराव चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्हा भाजपमय झालाविधानपरिषद निवडणुकीतील विजयाने भाजपच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब
अदृश्य हातांनी दिली निवडणुकीत साथ, खा.अशोकराव चव्हाणांचे नियोजन अन् महायुतीची एकजूट; आ.अमरनाथ राजुरकरांनी मतदारांचे मानले आभार!खा.अशोकराव चव्हाणच विजयाचे खरे शिल्पकार
चिखलीकरांची तलवार म्यान, अशोकनीतीमुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!गरजणारे बरसले नाहीत, लपून छपून वार करणार्‍यांचे शहरातून पलायन, राजुरकरांच्या वाटेवर काटे पेरणारे तोंडावर आपटले



जागतिक योग दिनानिमित्त भाजपा नांदेड महानगरच्या वतीने श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपा नांदेड महानगरचे अध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, विशेष पोलीस निरीक्षक शहाजी उमाप, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंह गाडीवाले, प्रवीण साले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या योग शिबिरात 500 हून अधिक योगसाधकांनी सहभाग घेत योगाभ्यासाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर योग संयोजक धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांनी केले. योग ही शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती असून निरोगी भारत घडविण्यासाठी योगाचा प्रसार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा शाल व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला. पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लंगडापुरे यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार तसेच दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगाभ्यास केला. या शिबिराला अमरनाथ यात्री संघ, पतंजली परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, हॅपी बीसी ग्रुप, मॉर्निंग वॉक ग्रुप, विविध शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक व धार्मिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले भव्य व्यासपीठ, एलईडी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण, ध्वनिक्षेपक व्यवस्था, अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सुविधा यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी युवा मोर्चा व भाजपा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी 24 जून रोजी श्रीराम सेतू, गोवर्धन घाट येथे आयोजित करण्यात आलेल्या 27 व्या भव्य चालण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. भाजपा नांदेड महानगरच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, नागरिकांचा वाढता प्रतिसाद नांदेडमध्ये योगाविषयी वाढत असलेली जागरूकता दर्शवत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

COMMENTS