Homeताज्या बातम्या

अशोकराव चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्हा भाजपमय झालाविधानपरिषद निवडणुकीतील विजयाने भाजपच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब

 माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद सातत्याने वाढत असून, आता

संत गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा; गुणवंतांचा होणार गौरव
विरोधकांच्या गोटात खिंडार, अमरनाथ राजुरकरांची विजयी हॅट्रिक; सूक्ष्म रणनीतीने महायुतीने राखले वर्चस्व
अदृश्य हातांनी दिली निवडणुकीत साथ, खा.अशोकराव चव्हाणांचे नियोजन अन् महायुतीची एकजूट; आ.अमरनाथ राजुरकरांनी मतदारांचे मानले आभार!खा.अशोकराव चव्हाणच विजयाचे खरे शिल्पकार



 माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद सातत्याने वाढत असून, आता नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ऐतिहासिक विजयाने भाजपच्या वाढत्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपचे महानगराध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी विजय मिळवत इतिहास रचला असून, त्यांच्या विजयाबद्दल खासदार अशोकराव चव्हाण यांनी विशेष शब्दांत अभिनंदन केले आहे.
गेल्या काही वर्षांत नांदेडच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत भाजपचे आमदार निवडून आले आहेत. विविध नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणत ग्रामीण व शहरी भागातील आपला जनाधार भक्कम केला आहे. नांदेड महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आणि भाजपचा महापौर विराजमान झाला. काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदेडमध्ये भाजपने टप्प्याटप्प्याने संघटनात्मक विस्तार करत आपली राजकीय मुळे अधिक मजबूत केली. त्याचाच परिपाक म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विजयाकडे पाहिले जात आहे. या विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाने नांदेड भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला विधान परिषदेची उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला. संघटनासाठी सातत्याने मेहनत घेणार्‍या आणि पक्ष वाढीसाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना या विजयातून व्यक्त झाली आहे. राजूरकर यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नसून, नांदेड जिल्ह्यात भाजपने उभारलेल्या मजबूत संघटनात्मक जाळ्याचा आणि महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंत आणि आता विधान परिषदेतही भाजपने आपले अस्तित्व ठळकपणे सिद्ध केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांवर या विजयाचा दूरगामी परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.

COMMENTS