Homeताज्या बातम्या

अदृश्य हातांनी दिली निवडणुकीत साथ, खा.अशोकराव चव्हाणांचे नियोजन अन् महायुतीची एकजूट; आ.अमरनाथ राजुरकरांनी मतदारांचे मानले आभार!खा.अशोकराव चव्हाणच विजयाचे खरे शिल्पकार

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महायुतीचे उमेदवार आ. अमरनाथ राजुरकर यांनी मतद

कांदा व ऊस उत्पादकांना मिळणार दिलासा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ; मुख्यमीं फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती
राज्यसभेसाठी नवनीत राणा यांची मोर्चेबांधणी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट



नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महायुतीचे उमेदवार आ. अमरनाथ राजुरकर यांनी मतदार, लोकप्रतिनिधी आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हा विजय महायुतीच्या एकजुटीचा आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे राजुरकर यांनी विशेष आभार मानले. मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे आणि त्यांनी दिलेल्या वेळेमुळेच हा दैदिप्यमान विजय शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीची संख्याबळ 284 मतांचे असतानाही त्यांना तब्बल 339 मते मिळाली. महायुतीच्या सर्व आमदार, नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनी भरभरून पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर नगरपालिका, महानगरपालिका आणि आता विधान परिषद निवडणुकीतही महायुतीने विजयाचा झेंडा फडकावल्याचे त्यांनी नमूद केले. महाविकास आघाडीच्या अपेक्षित मतांपेक्षा सुमारे 78 मते अधिक मिळाल्याने विरोधकांमधील अंतर्गत मतभेद व नाराजीचा फायदा महायुतीला झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. गुप्त मतदानामुळे नेमकी अतिरिक्त मते कुठून मिळाली हे सांगणे कठीण असले, तरी अनेक अदृश्य हात आपल्या पाठीशी उभे राहिल्याचे सूचक विधान त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण, अशोकराव चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे हे या विजयाचे प्रमुख शिल्पकार असल्याचा पुनरुच्चार करत राजुरकर यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच सर्व मित्रपक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

COMMENTS