Homeताज्या बातम्यासंपादकीय

पंतप्रधानांचा अमेरिका दौरा आणि वास्तव ! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न‌ऊ वर्षातील अमेरिकेला ५ वी भेट असली तरी, पहिल्यांदाच ते राजकीय डिप्लोमसी असलेली ही पहिलीच भेट आहे. तीन दिवसीय या भे

गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा अपरिहार्यच!
विधानसभेत ‘तारीख पे तारीख’ तर ऍड. आंबेडकरांचा काॅंग्रेसला इशारा !
जर्मनीत फॅसिस्ट बोकाळले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न‌ऊ वर्षातील अमेरिकेला ५ वी भेट असली तरी, पहिल्यांदाच ते राजकीय डिप्लोमसी असलेली ही पहिलीच भेट आहे. तीन दिवसीय या भेटीत पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक व्यक्तिमत्वांच्या भेटी घेणार आहेत. त्यात आज सकाळी त्यांनी टेस्ला उद्योगाचे प्रमुख एलन मस्क यांच्याशी त्यांची भेट झाली. एलन मस्क यांनी कसलेल्या व्यावसायिकाबरहुकूम शक्य तितक्या लवकर भारतात दाखल होण्याचे जाहीर केले. यापूर्वी, अशीच एक भेट मोदी यांनी झुकेरबर्ग यांची घेतली होती. हा संदर्भ याठिकाणी यासाठी द्यावासा वाटतो की, एलन मस्क यांनी पुढच्या वर्षी टेस्ला भारतात दाखल होईल असे सांगितले असले तरी, त्यात ट्विटर या समाज माध्यमाला सन २०२४ च्या पूर्वार्धात कसे मजबूत करता येईल, याचेच अधिक संकेत आहेत. फेसबुक चालवणारे झुकेरबर्ग यांची राजकीय उपयोगिता २०२४ मध्ये नसणार आहे, हे मोदी जाणून आहेत, त्यामुळेच त्यांनी टेस्ला ऐवजी ट्विटर मालक एलन मस्क यांची प्राधान्याने भेट घेतलेली दिसते. मोदी यांच्या अमेरिका भेटीत सर्वोच्च भेट अर्थातच जो बायडेन यांची असणार आहे. या सर्वोच्च डिप्लोमॅटीक भेटीचे महत्त्व ओळखून अमेरिकेतील जवळपास ७५ लोकप्रतिनिधींनी जो बायडेन यांना पत्र लिहून मोदी यांच्या भेटीत कोणत्या चिंताजनक प्रश्नांवर बोलावे, यावर हे पत्र प्रकाश टाकते. या पत्रात १८ सिनेटर आणि ८७ हाऊस ऑफ रिप्रेझेंटीव्ह च्या सह्या आहेत. ज्यात, भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करणे, विविध धर्माच्या अल्पसंख्याक समुदायांना जाणीवपूर्वक टार्गेट करून हल्ले केले जाणे आदी या भीषण बाबींवर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी थेट बोलावे अशी विनंती केली आहे. अर्थात, यावर वाॅलस्ट्रीट जर्नल ने थेट मोदींना प्रश्न विचारला परंतु, त्यांनी उत्तर देण्यास नकार दिल्याचे, या नियतकालिकाने म्हटले आहे. मोदी यांचा अमेरिका दौरा सुरू असतानाच अमेरिका आणि भारत यांनी भारतातील २६/११ च्या दहशतवादी हल्ला प्रकरणी लष्र-ए-तोयबा’ चा मीर साकिद याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची चीनला केलेले अपील चीन ने फेटाळून लावले आहे. मोदी यांचा अमेरिकन दौरा सुरू होण्यापूर्वी दहा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मणिपूर प्रश्नावर मोदींनी राखलेल्या मौनासंदर्भात प्रश्न उपस्थित केले व त्यांनी नेहमीप्रमाणे मौनालाच प्राधान्य दिल्याचे नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी ही साधारणतः आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिस्थिती आहे. यातील आपण एकेक बाबीचा थोडक्यात , विवेचन करण्याचा प्रयत्न केला तर ,असे म्हणता येईल की, एलन मस्क किंवा जगातील अन्य कोणताही उद्योजक भारत एक बाजारपेठ म्हणूनच विचार करणार. ही वस्तुस्थिती पाहता भारतात टेस्लाचे मार्केटिंग सहजशक्य असल्याने त्यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. मात्र, हे देखील तेवढेच खरे आहे की, अलिकडच्या निवडणूका या समाजमाध्यमांकडे असणाऱ्या डेटामुळे अधिक सोप्या होतात. मोदी सारखे सत्ता वाचविण्याचे महत्व असलेल्या नेत्याने ट्विटर प्रमुख म्हणून एलन मस्क यांना महत्त्व दिले आहे. तर, आगामी निवडणूकीचे जागतिक महत्व समजलेल्या अमेरिकन लोकप्रतिनिधींनी बायडेन यांना दिलेले पत्र मोदींवर जागतिक दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. मात्र, नेमक्या याचवेळी चीनने अमेरिका आणि भारत यांच्या संयुक्त विनंतीला न जुमानता पाकिस्तान च्या मीर साकिद याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव गुंडाळून ठेवत जगातील लोकशाही शक्तिस्थळ असणाऱ्या अमेरिका – भारत यांना आपण जुमानत नसल्याची मानसिकता प्रकट केली आहे. अमेरिका दौऱ्यावर शांतता आणि संवाद याचे महत्त्व रेखाटणारे मोदी मणिपूरसह देशात शांतता राखण्यासाठी कटीबद्ध राहतील, ही अपेक्षा!

COMMENTS