Homeताज्या बातम्या

योग हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हावा – प्रणिता देवरे-चिखलीकर

12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड शहरातील बँक येथे सहकार भारतीच्या वतीने उत्साहपूर्ण योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी
योग मानवी चेतनेशी जोडणारा सेतू : पंतप्रधान मोदी
योगा दिनानिमित्ताने १५१ सूर्यनमस्कारांचा संकल्प यशस्वी  



12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड शहरातील बँक येथे सहकार भारतीच्या वतीने उत्साहपूर्ण योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा तसेच  बँकेच्या अध्यक्षा  प्रणिता देवरे-चिखलीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित योगसाधकांशी संवाद साधताना सौ. देवरे-चिखलीकर म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे योग ही केवळ भारतापुरती मर्यादित न राहता जागतिक चळवळ बनली आहे. योग हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे. संपूर्ण जगाला आरोग्य आणि शांततेचा संदेश देणारी भारताची प्राचीन परंपरा म्हणजे योग असून, त्याचा स्वीकार प्रत्येकाने करणे काळाची गरज आहे. सहकार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींनी योगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात योगशिक्षक व्ही. डी. बिराजदार, सहकार भारती नांदेड जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव महाजन, जिल्हा महामंत्री दत्तात्रय उबाळे, संघटनमंत्री प्रशांत तीर्थे, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा पराडकर,   अध्यक्ष डॉ. सोपानराव क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने योगसाधक उपस्थित होते. कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. योग दिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्पही केला.

COMMENTS