Homeताज्या बातम्या

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना माहूरकरांची भावपूर्ण आदरांजली; प्रतिमेचे पूजन करून अभिवादन

माहूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त माहूर शहरातील द

एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या; लहुजी शक्ती सेनेची मागणी
माहूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार कमिशनच्या प्रतीक्षेत; ६ महिन्यांपासून मानधन थकीत, १ जुलैपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
मुदखेड येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८६ वी जयंती उत्साहात साजरी

माहूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त माहूर शहरातील दत्त चौक (टी-पॉईंट) येथे बुधवारी सकाळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे, भाजपाचे तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख जितू चोले यांनी स्व. मुंडे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत मनोगत व्यक्त केले. वक्त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षमय राजकीय प्रवासाची आठवण करून दिली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ, वंचित आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेला सातत्यपूर्ण संघर्ष यामुळे त्यांनी जननेते म्हणून ओळख निर्माण केल्याचे सांगितले.

त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन समाजकारण व राष्ट्रकारणात योगदान देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती वसंत कपाटे, राजू दराडे, इर्शाद मकराणी, सुरेश गिऱ्हे, अनुदीप कोरटकर, संतोष अग्रवाल, गोपाल खापर्डे, रामकिसन केंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

COMMENTS