Homeताज्या बातम्यामनोरंजन

बाहुबली फेम अभिनेता नस्सर यांच्या वडिलांचे निधन

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. टॉलिवूड चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते आणि बाहुबली फेम नासर यांचे वडील महबूब बाशा यांचे निधन झाल

रोहित शर्माचे वादळी शतक
अमिताभ बच्चन शुटिंग दरम्यान जखमी
बंदी उठवल्याने नगरमध्ये बैलगाडाप्रेमींचा जल्लोष

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. टॉलिवूड चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते आणि बाहुबली फेम नासर यांचे वडील महबूब बाशा यांचे निधन झाले आहे. नासर यांच्या वडीलांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, अभिनेत्याच्या वडीलांची गेल्या अनेक दिवसांपासून तब्येत बरी नव्हती. अभिनेत्याच्या वडीलांनी तामिळनाडूतल्या चंगेलपेट येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.वडिलांच्या निधनामुळे अभिनेता नासरसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महबूब बाशा यांच्या निधनामुळे टॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 12 ऑक्टोबर रोजी मेहबूब बाशा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (अभिनेता नासर हे टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या नासर हे ॲक्टर्स युनियनचे अध्यक्ष आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, मेहबूब बाशा यांना सुरुवातीपासूनच आपल्या लेकाला (नासरला) अभिनेता बनवायचे होते. आपल्या मुलाला अभिनेता बनवण्यासाठी त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. नासर यांचे वडील मेहबूब बाशा हे पेशाने आधीपासूनच ज्वेलरी पॉलिशिंगचे काम करायचे. त्यांनी आपल्या पगारातून लाडक्या लेकाला अभिनय कार्यशाळेत प्रवेश मिळवून दिला

COMMENTS