Homeताज्या बातम्या

एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या; लहुजी शक्ती सेनेची मागणी

माहूर : अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील विविध जातींना आरक्षणाचा समन्यायी लाभ मिळावा यासाठी एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात

माहूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार कमिशनच्या प्रतीक्षेत; ६ महिन्यांपासून मानधन थकीत, १ जुलैपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
मुदखेड तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार; गाढवांसह तहसीलवर धडक देत सरकारच्या धोरणांचा निषेध
ज्येष्ठ समाजसेवक भीमरावजी दुधारे यांचे हृदयविकाराने निधन; भोकर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात शोककळा
लहुजी शक्ति सेना, - महाराष्ट्र राज्य Lahuji Shakti Sena  (@LahujiShaktiSenaMHState) - Photos | Facebook

माहूर : अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील विविध जातींना आरक्षणाचा समन्यायी लाभ मिळावा यासाठी एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची टक्केवारी निश्चित करावी, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या माहूर तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार माहूर यांच्यामार्फत सदस्य सचिव तथा महासंचालक, बार्टी (सामाजिक न्याय विभाग), महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर राज्यात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात ५९ हून अधिक पोटजातींचा समावेश असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाचा मोठा लाभ काही मोजक्या जातींपुरताच मर्यादित राहिल्याचे दिसून येते. परिणामी अनेक अति-मागास व अल्पसंख्याक जाती शिक्षण, रोजगार व सामाजिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर एससी प्रवर्गाचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ अशा उपगटांमध्ये वर्गीकरण करून प्रत्येक गटाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा वाटा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे सर्व घटकांना समान संधी उपलब्ध होऊन आरक्षणाचा लाभ अधिक न्याय्य पद्धतीने मिळू शकेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनावर लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष देवानंद भांडवले, शिवाजी जोगदंडे, अतुल खानजोडे, मिलिंद चांदणे, दत्ता आठवले, आतिश काळे, सतीश उमाप, शेकन्ना गुंडावार, गणपत मस्के आदी पदाधिकारी व समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS