Homeताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतापराव चिखलीकर यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

नांदेड विधान परिषद निवडणूक व विकासकामांवर चर्चा नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यम

शंकर बरडे खून प्रकरणात आरोपींना मोठा झटका; न्यायालयाकडून पाचही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले
कारवाई की पाठराखण? नियंत्रण कक्षातून थेट वाहतूक शाखेत मारोती मुंडे यांची नियुक्ती; पोलीस दलात चर्चेला उधाण
केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता; मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्राला काहीसा दिलासा

नांदेड विधान परिषद निवडणूक व विकासकामांवर चर्चा

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबई येथे माजी खासदार तथा विधिमंडळ उपविधान समितीचे प्रमुख प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान नांदेड जिल्ह्याच्या राजकीय घडामोडी, आगामी विधान परिषद निवडणूक तसेच लोहा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्ष संघटनात्मक बाबींची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिली.

यावेळी शिष्टमंडळाने लोहा विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, सिंचन प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या प्रलंबित कामांसंदर्भात विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत सविस्तर निवेदन सादर केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रस्तावांचा अभ्यास करून आवश्यक त्या विकासकामांना प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. या भेटीप्रसंगी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS