Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण रेल्वे स्थानकात आढळली स्फोटके

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण रेल्वे स्थानकात तब्बल 54 डिटोनेटर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले अस

हवामान बदलाचे वाढते धोके
मुलगी व मुलासोबतच सूनही पोलीस दलात; इस्माईल व फिरोज शेख यांची मेहनत आणि जिद्दीचे फळ
या आमदाराच्या पत्नीने केली आत्महत्या l LOK News 24

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण रेल्वे स्थानकात तब्बल 54 डिटोनेटर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी संशयास्पद सामुग्री ताब्यात घेतली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 1 च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली. संशय आल्यामुळे याबाबत पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच श्‍वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बेवारस बॅगेची तपासणी केली असता त्यात 54 डिटोनेटर आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिटोनेटर हे स्फोट घडवून आणण्यासाठी वापरले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात हे डिटोनेटर रेल्वे स्थानकात कसे आले? याचा पोलिस शोध घेत आहे.

COMMENTS