काव्यप्रेमी शिक्षक मंचासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल बीड येथील रट्टाकार द.ल. वारे यांना ‘कै. सौ. संजिवनी यशवंत मराठे स्मृती काव्यप्रेरणा पुरस्कार’

काव्यप्रेमी शिक्षक मंचासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल बीड येथील रट्टाकार द.ल. वारे यांना ‘कै. सौ. संजिवनी यशवंत मराठे स्मृती काव्यप्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रविवार, 10 मे 2026 रोजी सोलापूर येथील लोकमान्य टिळक सभागृह, श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, किल्ला बागेजवळ आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. इ. जा. तांबोळी हे होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक डॉ. सुहास पुजारी तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे राज्य प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्य सचिव कालिदास चवडेकर, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे तसेच राज्यभरातील पदाधिकारी व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS