परळी वै.: परळी वैजनाथ तालुक्यात व शहरात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पारा 41 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आगामी

परळी वै.: परळी वैजनाथ तालुक्यात व शहरात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पारा 41 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आगामी दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे.उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच शेतकरी बांधवांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, विशेषतः 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तहान नसली तरी नियमित पाणी प्यावे, तसेच लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करावा. उन्हापासून संरक्षणासाठी हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत. बाहेर पडताना टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे-कलिंगड, संत्री, द्राक्षे-यांचा समावेश करावा. कडक उन्हात श्रमाची कामे टाळावीत तसेच चहा-कॉफीचे अतिसेवन आणि मद्यपान टाळावे.तसेच उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात मोठी वाढ होत असून, त्याचा परिणाम डोळ्यांवर जाणवत आहे. उष्ण वारे, धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, जळजळ, लालसरपणा, तसेच कोरडेपणा यांसारख्या समस्या वाढत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडणार्या नागरिकांना या त्रासाचा अधिक सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात शरीरासोबत डोळ्यांनाही पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे असते. दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेतल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. अपुरी झोप असल्यास डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा आणि लालसरपणा वाढू शकतो. शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा, डोळ्यांची उघड-झाप करत राहणेही महत्त्वाचे आहे. उन्हात फिरताना नागरिकांनी डोळ्याची विशेष काळजी घ्यावी. बाहेर जातांनी डोळ्याना चष्मा वापरा. तसेच थंड पाण्याने धूत जा. दुपारी उन्हाचा पारा जास्त असल्याने घराबाहेर जाणे टाळावे. आवश्यक असल्यास काळजी घ्यावी तसेच शेतकरी बांधवांनी पशुधनाची काळजी घ्यावी, पाणी चारा वेळेवर करावा त्यांना सावली ठिकाणी बांधावा असे आवाहन केले. डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या, स्नायूंमध्ये आकडी, हृदयाचे ठोके वाढणे किंवा त्वचा कोरडी पडणे ही उष्माघाताची लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला तात्काळ सावलीत आणून शरीर थंड करावे व जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे.वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला व आजारी नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. कोणतीही लहान मुले किंवा पाळीव प्राणी बंद वाहनात ठेवू नयेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेऊन स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, तसेच शेतकरी बांधवांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS