Homeताज्या बातम्या

म्हाडाचा अठरावा लोकशाही दिन आता ९ जूनला; अपरिहार्य कारणांमुळे तारखेत बदल

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वतीने आयोजित करण्यात आलेला अठरावा लोकशाही दिन आता ९ जून २०२६ रोजी पार पडणार

एसटी प्रवाशांना दरवाढीचे संकेत; डिझेल दरवाढीमुळे ३१० कोटींच्या खर्चात वाढ
लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांचेच मानधन बंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
सायन-पनवेल महामार्गावर मुसळधार पावसामुळे जलमय परिस्थिती; १२ तासांच्या संततधारेने नवी मुंबईत वाहनांच्या लांबच लांब रांगा!
म्हाडाचा १८ वा लोकशाही दिन आता ९ जून रोजी - Hindusthan Samachar Marathi

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वतीने आयोजित करण्यात आलेला अठरावा लोकशाही दिन आता ९ जून २०२६ रोजी पार पडणार आहे. पूर्वी हा कार्यक्रम ८ जून रोजी होणार होता; मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे तो एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती म्हाडा प्रशासनाने दिली आहे.

हा लोकशाही दिन मंगळवार, ९ जून रोजी दुपारी १२ वाजता वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल भूषविणार आहेत.

प्रलंबित प्रकरणांच्या निपटऱ्यासाठी मोठी मदत: म्हाडाने जानेवारी २०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन सुरू केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या तक्रारी, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. यामुळे तक्रारींचे जलद निवारण होण्यास मदत होत असून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.

आतापर्यंत १७ लोकशाही दिनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून अनेक वर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे या व्यासपीठाच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. लोकशाही दिनात संबंधित अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांवर थेट आणि खुली चर्चा करतात, ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता वाढली असून नागरिकांना वेळेवर न्याय मिळण्यास मदत झाली आहे.

COMMENTS