दीड लाखाची लाच घेतांना तहसीलदारास रंगेहाथ पकडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीड लाखाची लाच घेतांना तहसीलदारास रंगेहाथ पकडले

वाळू वाहतुूक करण्यासाठी तब्बल दीड लाखाची लाच घेणार्‍या तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

बांधकाम व्यावसायिकाची जिममध्ये आत्महत्या
महापुरुषांची बदनामीच्या निषेधार्थ  हमाल कष्टकऱ्यांनी बाजार समितीसमोर केले निदर्शने
करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान 

औरंगाबाद : वाळू वाहतुूक करण्यासाठी तब्बल दीड लाखाची लाच घेणार्‍या तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, शहर महसूल परिसराच्या हद्दीत वाळूची वाहतूक करायची असल्यास प्रतिमहिना दीड लाख रुपये हप्ता देण्याची मागणी तक्रारदारकडे तहसीलदार देशमुख यांनी केली होती. 

ही रक्कम जर दिली गेली नाही, तर मग ठेकेदाराच्या वाहनांवर कारवाई करणार, अशी धमकी देखील देण्यात आली होती. या धमकीनंतर ही रक्कम न देता आपण लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल करायची असे वाळू वाहतूक करणार्‍या ठेकेदाराने ठरवले, त्यानंतर याबाबतची तक्रार त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. संबंधित पथकाने लाच मागणीची शहनिशा केली. त्यानंतर तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना रंगेहाथ पकडण्याची योजना आखण्यात आली. त्या प्रमाणे मग सापळा रचला गेला. सोमवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजता तहसीलदार देशमुख यांनी तक्रारदाराला पैसे घेऊन बोलावले होते. ठरल्याप्रमाणे दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन तक्रारदार हा देशमुख यांच्याकडे गेला. त्यानंतर ही रक्कम स्वीकारताना देशमुख यांना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे निकाळजे आणि त्यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 

COMMENTS