बेलापूर : भारतीय विवाह सोहळा म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे नाते नाही, तर संस्कृती, परंपरा आणि भावनांचा भव्य संगम… आणि याच अनुभवासाठी थेट इंग्लंडहून

बेलापूर : भारतीय विवाह सोहळा म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे नाते नाही, तर संस्कृती, परंपरा आणि भावनांचा भव्य संगम… आणि याच अनुभवासाठी थेट इंग्लंडहून पाच परदेशी पाहुणे बेलापूरात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे बेलापूरातील विवाह सोहळ्याला आंतरराष्ट्रीय रंग चढला.
बेलापूर येथील पत्रकार देविदास देसाई यांचे पुतणे सागर यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त इंग्लंडमधील ऑर्थर, जोंनथन, अलेक्स, लिडीया आणि अमेलिया हे पाहुणे खास उपस्थित राहण्यासाठी आले होते. “भारतीय संस्कृतीतील विवाह सोहळा प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती, म्हणून आम्ही खास येथे आलो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“भारतीय संस्कृती खरोखर महान आहे. येथे प्रेम, आपुलकी, आदर आणि कुटुंबीयांचे नाते अतिशय जवळून अनुभवता आले. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संस्कृती वेगळी आणि आदर्श वाटते,” अशा शब्दांत परदेशी पाहुण्यांनी आपली भावना व्यक्त केली.
या स्वागत सोहळ्यात बेलापूर ग्रामस्थ, सत्यमेव जयते ग्रुप आणि देसाई परिवार यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, विष्णुपंत डावरे, सोमनाथ जावरे, बाबुलाल पठाण, गोपी दाणी, साहेबराव बैताडे, संजय भोंडगे, विशाल मेहेत्रे, बाबुराव पवार, अजीज शेख, जाकीर शेख, अल्ताफ शेख, प्रविण बाठीया, मयूर खरात, रफीक शेख, चाँद शेख, मोहसीन सय्यद, शफीक बागवान आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
‘सीमांच्या पलीकडे जाणारी संस्कृती’
बेलापूरातील या विवाह सोहळ्याने एक गोष्ट स्पष्ट केली—भारतीय संस्कृतीची ओढ ही केवळ देशापुरती मर्यादित नाही, तर ती जगभरातील लोकांना आकर्षित करणारी आहे. परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीने हा सोहळा केवळ विवाह न राहता संस्कृतीच्या जागतिक संवादाचा सुंदर क्षण ठरला.

COMMENTS