Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह वणव्यात खाक

अकोले  : तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह शनिवारी (दिनांक २५) लागलेल्या भीषण वणव्यात जळून खाक झाले. हा ऐतिहासिक वारसा नष्ट

अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव
एनएमएमएस परीक्षेत कोतुळेश्वर विद्यालयाचे यश
सातेवाडीच्या श्रेयशची ‘नवोदय’साठी निवड

अकोले  : तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह शनिवारी (दिनांक २५) लागलेल्या भीषण वणव्यात जळून खाक झाले. हा ऐतिहासिक वारसा नष्ट झाल्याची हुरहुर मात्र ब्राह्मणवाडा ग्रामस्थांना लागली आहे.

ब्राह्मणवाडा व कोतुळ दोन्ही विश्रामगृहे स्वातंत्र्यपूर्व काळात (ब्रिटिश काळात) सन १९४५ साली बांधण्यात आली. दोन्ही ठिकाणी बांधकामासाठी दगड, चुन्याचा वापर करण्यात आला होता. लाकडी छतावर गोल धोप्याच्या कौलांचा वापर केला होता. तर खाली शहाबादी फरशी बसवलेली होती. त्याकाळी ब्राह्मणवाडा विश्रामगृहाच्या बांधकामासाठी २४ हजार रुपये तर कोतुळ विश्रामगृहासाठी २५ हजार ९६८ रुपये खर्च आला होता. २००८ मध्ये ब्राह्मणवाडा विश्रामगृहाची दुरुस्ती करण्यात आली होती. जुने प्लास्टर काढून नवीन प्लास्टर, नवीन फरशी, नवीन शौचालय आणि रंगकाम करण्यात आले होते. त्याच वर्षी कोतुळ विश्रामगृहाची देखील दुरुस्ती झाली. त्यामध्ये छत बदलणे, व्हरांड्यात ग्रीड व गेट लावणे, रंगकाम ही कामे करण्यात आली. आज पुन्हा कोतुळ विश्रामगृहाची पडझड झाल्याची पहायला मिळते.

 शासनाने ब्राह्मणवाडा विश्रामगृहाची देखभाल करण्यासाठी मैल कामगार ठेवला होता.पण पुढे शासनाने ते पद बंद केले. येथील मैल कामगाराचे शिक्षण कमी असल्याने त्यालाच चौकीदार म्हणून ठेवले. सन २०२१ मध्ये चौकीदार सेवानिवृत्त झाला.तेव्हापासून पाच वर्षे तेथे कोणताही कर्मचारी नव्हता.

 दिनांक २७ एप्रिल १९४१ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोतुळ येथे येऊन गेल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. त्यांची आठवण म्हणून कोतुळ विश्रामगृह स्मारक कमिटीकडे हस्तांतराची करण्याची हालचाल सुरू आहे.

८१ वर्षांच्या आठवणींचा साक्षीदार

 ब्राह्मणवाडा विश्रामगृह ब्रिटिश काळात सरकारी अधिकारी, पाहुणे प्रवासादरम्यान मुक्कामासाठी या जागेचा वापर करत असत. या बंगल्याची रचना त्या काळातील वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानली जात होती. माजी आ. गोपाळा भांगरे, माजी आ. यशवंतराव भांगरे,माजी आ. कॉ. बी. के. देशमुख, माजी मंत्री दादासाहेब रूपवते, माजी मंत्री मधुकरराव पिचड,समाजसेवक लामा लोम झांग,आजी-माजी खासदार, आमदार अशा अनेक विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींचा पदस्पर्श या वास्तूस झाला होता.

 दुर्दैवाने हा जुना आणि ऐतिहासिक वारसा गेली पाच वर्षे दुर्लक्षित अस्वथेत होता. जुन्या कौलारू छताची पडझड झाली होती. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडेझुडपे वाढली होती. शनिवारी लागलेल्या भीषण वणव्यात हा बंगला खाक झाला. ८१ वर्षांच्या आठवणींचा साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक वास्तुच्या ब्राह्मणवाडा ग्रामस्थांच्या मनात आता केवळ आठवणी उरल्या आहेत.

COMMENTS